या उत्खनन मध्ये मंडल अधिका-यांचा संगमताने तर नाही ना? तहसिलदार यांच्या परवानगी विना मुरूम उचलला कसा? सर्वे क्र.338 हि शेत जमिन विकली परंतू 7/12 वर खरीददारचे नाव का नाही? शेती विकणाऱ्या किंवा खरेदी करणारयावर कारवाही होणार का ?
युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- सावनेर तालुक्यातील मौजा मालेगांव (जोगा) येथील शेत सर्वे कु. 338 हि शेत जमिन एका नामांकित मंडल अधिकारी यांचा परिवाराच्या सदस्याने विकत घेतली आहे परंतु त्याच जमिनीवरून मात्र अवैध रित्या मुरूमांचे दररोज दिवस रात्र उत्खनन सुरू असुन त्यात अंदाजे 100 से 150 ट्रक द्वारे मोट्या प्रमाणात मुरूमाचा माल जेसीबीद्वारे काढ़ूंन ट्रकमद्दे भरूंन बिल्लेवाट लावली जात आहे. त्यात रॉयल्टीचा पैसा भरलेला नाही त्यामुळे शासनाचे कोट्यवधींचा महसुलचे नुकसान झालेले आहे. सबोत पर्यावरणाला हानी पोहचत आहे.
मालेगांव (जोगा) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या उत्खनन करण्यात येत आहे. त्याचे जीएसटी बिल भरण्यात आलेले नाही यात मागील तहसिलदार यांची सुध्दा ट्रक वाहतुकी मद्दे भागी दारी होती असा नागरीकांचा चक्क आरोप आहे. मालेगांव (जोगा) येथे दिनांक 15 जून रोजी मुरूम माफिया वर कारवाही झाली परंतु विलंबाने कारवाही का करण्यात आली ? कारवाही दरम्यान कोन कोणते आधिकारी उपस्थित होते? यात मुरूम उत्खनन मध्ये मंडल अधिकारी, इतर व्यक्ती होते त्यात ट्रक जेसीबी आढळून आली त्याची परिपूर्ण मोका चौकशी झाली का? व तसेच चौकसी अहवाल तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकड़े सादर केला का? असे खळबळ जनक प्रश्न नागरिकात चर्चेला उधाण आले.
या प्रकरनाची तात्काल चौकशी करुन भष्ट्र लोकांवर आणि अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाही करण्यात यावी अशी स्थानिक नागरीकानी मागणी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप 9766445348/7385445348

