हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा (पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुराच्या वतीने दिनांक ११ जून ते २० जून २०२३ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, तक्षशिला नगर बामणवाडा, तालुका राजुरा येथे धम्म उपासक, उपासिका प्रशिक्षण शिबीरचे आयोजन विक्रमशीला बहुउद्देशीय बामणवाडा तर्फे करण्यात आलेले होते. दि २० जून २०२३ रोज मंगळवार ला शिबीराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबिरामध्ये सर्व प्रथम गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धर्मुजी नगराळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील घेऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला असंख्य उपासक, उपासिका यांनी सहभाग घेऊन धम्माचे प्रशिक्षण घेतले.
या शिबीर मध्ये किशोर तेलतुंबडे, गजभिये, रमण पुणेकर, प्रा. दिनेश घागरगुंडे, दीपक नगराळे, कल्याणी देवगडे, श्रावंती खोब्रागडे, कमल टेकाडे, वंदना देवगडे, उषा नगराळे, सुषमा नगराळे, उज्वला वाघमारे, स्वेता वाघमारे यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे भा. बौ. म राजुरा तालुका अध्यक्ष होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संदीप सोनोने उपाध्यक्ष, गौतम चौरे, अमरदीप वनकर अध्यक्ष, सपना कुंभारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विभाग केंद्रीय शिक्षिका, प्रगती मेश्राम, कांता मून, कविता अलोने महिला सचिव, संगिताताई अलोने केंद्रीय शिक्षिका हे होते. तर सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव खोब्रागडे तर संचालन सुजाताताई नळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गौतम देवगडे यांनी केले.
तर प्रारंभी प्रशिक्षणार्थी बहुसंख्य महिलांनी आपले दहा दिवसामध्ये जे शिकायला मिळाले त्याबद्दल लालचंद वाघमारे, सुरेश जीवने, धनराज दुर्योधन, भारत फुलझेले, श्रुती वाघमारे, सरिता देवगडे, निहारिका ढोणे, सपना शेंडे, वैशाली लाटेलवार, सुनंदा रामटेके, शीतल ब्राह्मणे किनाके मॅडम, विशेष आदिवासी महिलेने आपले मनोगत व्यक्त केले. या शिबीरामध्ये दहा दिवसात सर्वच विषयांवर सुजाताताई लाटकर यांनी उत्तम तर्हेने शिकविल्याबद्दलची पावती दिली, त्याबद्दल सर्वांनी सुजाताताई यांचे अभिनंदन केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वच प्रशिक्षणार्थी महिलांना उपासक, उपासिकाना प्रमाणपत्र देऊन गोैरविण्यात आले. या शिबिराला दहा दिवस प्रशिक्षण देणाऱ्या सुजाताताई लाटकर केंद्रीय शिक्षिका यांचे उपासक, उपासिकाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी सर्वा करीता विक्रम शिला बहुउद्देशीय संस्था नी सुंदर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
तक्षशिला नगर बामणवाडा येथील सदर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रसंगी पाहुण्यांचा झालेला आदर सत्काराचे स्वरूप पाहुन पाहुण्यांचे मन भारावून गेले. इतरांना बोध घेण्यासारखा प्रसंग होता. राजुरा तालुका शाखेचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे चंद्रपूर जिल्हा, तालुका व शहर शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद आणि सहर्ष आभार मानण्यात आले. असेच भारतीय बौद्ध महासभा च्या कार्यास सहकार्य करावे आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांनी दिलेला विज्ञानवादी बौद्ध धम्म घरा घरात पोहचवावा अशी मंगलकामना यावेळी करण्यात आली.

