✒️आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात एका आरोपीला हिंगणघाट येथील न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी नरेश वामन सुरपाम राहणार पोहना याने दिनांक 10 एप्रिल 2018 रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी तिच्या घरात घुसून तिचे हात धरून तिचे विनयभंग केल्याची घटना घडली होती त्या प्रकरणात फिर्यादीने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वडनेर येथे भादवी कलम 452 व 354 अ अन्वये तक्रार दाखल केली होती.
वडनेर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून सर्व गवा पुरावे जमा करून हे सुनावणी साठी कोर्टात दाखल केले होते. हे प्रकरण विद्यमान पहिले प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री व्ही एच देशमुख हिंगणघाट यांचे कोर्टात चालले असून सदर प्रकरणात सरकार पक्षाची बाजू अजय कैतवास सहाय्यक सरकारी वकील यांनी मांडली असून प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासले व युक्तिवाद केला त्यांचे युक्तीवाद व आलेल्या पुराव्यात ग्राह्य धरून कोर्टाने आरोपी कलम 354 व 452 अंतर्गत दोषी ठरवून प्रत्येकी एक-एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोकावली व रक्कम रुपये 1500 दंड केले ठोकवला आहे.
वरील प्रकरणात सरकारी पक्षास पोलीस स्टेशन वडनेर चे दोन्ही पैरवी एलपीसी सौ धम्मश्री सुखदेवे व भावना गहुकार यांनी सहकार्य केले.

