पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २२/०६/२०१३ रोजी पेरवडा पोलीस ठाणे हद्दीत मच्छी मार्केटजवळ चित्रा चौक येथील अक्षय अपार्टमेटमध्ये घरफोडी चोरी झाल्याचे समजताच युनिट ४ कडील पथक घटनास्थळी तपासकामी रवाना झाले. सदर पथकाने घटनास्थळी व परिसरामध्ये बारकाईने अनेक सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन करून संशयिताचे फुटेज प्राप्त केले. सदरचे फुटेज बातमीदारास दाखविले असता फुटेजमधील संशयित हा नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ, जिजामातानगर, येरवडा, पुणे येथे त्याचे लाल रंगावे स्कुटी मोपेडरात उभा असल्याची अचुक माहिती वैभव रणपिसे व रमेश राठोड यांना मिळाली. त्यानंतर मिळाले बातमीच्या ठिकाणी जाऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विजय अरविंद गणबोटे, वय ५३ वर्षे, सध्या रा. तुळजाभवानी बिल्डींग, येरवडा, पुणे असे सांगितले, त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे सोन्या-चांदिये दागिने, मोबाइल व रोख रक्कम मिळुन आली. त्याबाबत त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे त्यास गुन्हे शाखा कार्यालयात आणुन सविस्तर चौकशी केली असता त्याने मच्छी मार्केट, चित्रा चौक येथील एका अपार्टमेंटमध्ये कुलुप लावुन बंद असलेल्या पलॅटची कटावणीने कडी कोयंडा तोडुन घरफोडी चोरी करुन सोन्या चांदिचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम चौरल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याकडे मिळुन आलेला घरफोडी चोरीतील सोन्या-चांदिचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम व गुन्हा करताना वापरलेली स्कुटी मोटार सायकल 4 स्फुटीचे डिक्कीमध्ये कटावणी व स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ४,००,०००/- चा मुद्देमाल जप्त केला..
सदरचा मुद्देमाल व आरोपी पुढील कार्यवाहीकरीता येरवडा पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले. नमुद आरोपीविरुद्ध सन २००१ पासून पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तसेच नमुद आरोपीस शिरुर पो स्टे च्या गुरने ७००/२०१७ गुन्ह्यामध्ये ५ वर्षाची शिक्षा झालेली आहे व तो सध्या शिक्षा पूर्ण करुन सुटला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस अमलदार विठ्ठल वाव्हळ, रमेश राठोड, वैभव रणपिसे, अमोल वाडकर यांनी केली आहे.

