ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील पाचोरा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जून शुक्रवारीला लग्न झालेल्या नवविवाहितेने आपल्या प्रियकरासह आत्महत्या केली. ही घटना पाचोरा येथे सिंधी कॅम्प परिसरातील एका पडक्या शाळेत रविवारी रात्री घडली. साक्षी सोमनाथ भोई वय 18 वर्षे आणि जितेंद्र राजेंद्र राठोड वय 18 वर्षे, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. ही प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.
18 वर्षीय साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथील युवकाबरोबर रीतिरिवाने झाला होता. विवाहानंतर ती रविवारी आपल्या माहेरी पाचोरा येथे आली होती. अंगावरील हळद सुखण्याआधीच तिने आपल्या प्रियकरासह आत्महत्या केली.
पाचोरा येथे सिंधी कॅम्प परिसरातील एका पडक्या शाळेत या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे परिसरातील काही नागरिकांना दिसले. याची माहिती पाचोरा पोलिसाना देण्यात आली. पोलिस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर मृतुदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यात आला.
नवविवाहित साक्षी ने आत्महत्या केल्याची माहिती पती आणि सासरच्या लोकांनी कळताच सासर आणि माहेर वर कोसळला दुःखाचा डोंगर कोसळला.

