युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रामटेक:- तालुक्याच्या वतीने अनिल देशमुख माजी गृहमंत्री, रमेशचंद्र बंग माजी मंत्री, शिवराज बाबा गुजर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश गजभिये, सलील दादा देशमुख, राजू राऊत तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख, अविनाश गोतमारे, संतोष नरवडे, शोयब असद, किशोरजी बेलसरे रामटेक विधानसभा अध्यक्ष रमेश फुले प्रदेश सरचिटणीस, शैलद्र तिवारी शहर अध्यक्ष नागपूर युवक यांच्या उपस्थितीत अनेक रामटेक तालुक्यातील युवकांचा प्रवेश घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष आशिष पुंड यांच्या सहमती ने विवेक नोकरकर नगरधन यांची रामटेक तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्वप्निल रहाटे यांची रामटेक शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी पक्ष वाढीवर आणि संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
आगामी येणारी नगरपरिषद, विधानसभा व लोकसभेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे यावेळी सांगण्यात आले. या पक्षप्रवेश नियोजन रामटेक तालुका अध्यक्ष नकुल बरबडे, रामटेक शहर अध्यक्ष नितीन विरुळकर, महिला शहर अध्यक्ष अलका बघेल, देवा डोंगरे यांनी केले होते. या प्रसंगी तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

