प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तसेच प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात समुद्रपूर तालुक्यातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अशोक डगवार यांच्या प्रवेशामुळे समुद्रपूर तालुक्यात पक्षाचे चांगले संघटन तयार व अधिक मजबूत होईल, तसेच तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली ताकद मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
अशोक डगवार हे २० वर्षा पासून युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच काँग्रेस जिल्हा सचिव म्हणून दहा वर्षे कार्यरत राहिले तसेच १५ वर्षे ते ग्रामपंचायत सदस्य राहिले, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष १५ वर्ष होते. कलार समाजाचा ओबीसी जिल्हाध्यक्ष पद त्यांच्या कडे होते असे विविध पदावर ते कार्यरत होते. तसेच २०१४ ला जिल्हा परिषद निवडणूकित त्यांच्या अल्पमताने पराभव झाला होता.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डगवार यांनी समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा बनविण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करेल असे मत व्यक्त केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग प्रामुख्याने उपस्थित होते.

