उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य. जिल्हा सांगली मधील कवठेमहांकाळ येथे उप जिल्हा रूग्णालय मध्ये काम करणाऱ्या कंत्रटी आरोग्य सेवकावर होत असलेला अन्याय अत्याचार दुर करून त्यांच्या मुलभूत गरजा पर्ण करण्यात यावेत यासाठी अधिक्षक उप जिल्हा रूग्णालय, कवठेमहांकाळ यांना दि.१५ जुन २०२३ रोजी लेखी निवेदनातून म्हणने मांडण्यात आले होते परंतू अद्यापपर्यंत डि.एम. एटरप्रायजेस या कंत्राटदाराने कोणतेच सकारात्मक निर्णय घेतले नसल्यामुळे २६ जुन २०२३ पासुन बेमुदत काम बंद आंदोलनास सुरवात करण्यात आली
या खाजगी कंपनी कंत्रती कामगाराचे शोषण करत असुन, त्यामुळे सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य. आक्रमक झाली आहे. त्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आपल्या मागण्या बदल बोलताना म्हणाले की प्रामुख्याने कंत्रटी आरोग्य सेवकांचे पगार वाढ, काम करताना लागणारे उच्च दर्जेदार साहित्य, आरोग्य व अपघाती किमान पाच लाखापर्यंत विमा आणि पगारी सुट्टी इत्यादी मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन होत आहे.

त्या वेळेस संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी, जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, शहर जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाउपाध्यक्ष हरीश वाघमारे, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत कांबळे वंदना सुभाष कांबळे, प्रमिला माणिक जामदाडे, अनिता रावसाहेब कुंभार, नंदा शंकर जावीर, गणेश मल्हारी केंगार आदि उपस्थित होते.

