उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने श्रवस्ती विहार संजय नगर सांगली येथे. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती राजश्री शाहू महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजश्री शाहू महाराज याचेवर जीवनावर बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली चे सचिव पवन वाघमारे आणी खजिनदार माने सर यांनी आपले विचार व्यक्त केले. एक अत्यंत आणी निष्कपट असा माणुसकीचा झरा छत्रपती शाहू च्या रूपाने आपल्या महाराष्ट्राला लाभला लोकांच्या सुख दुःखाला स्वतः चे सुख दुख समजणारे चिखलात रुतलेल्याना बाहेर येण्यासाठी मदत करणारा व महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित असलेली सर्व कामे करणारा लोक सिद्ध शाहू राजा इतिहासात समाज क्रांती चा झेंडा राजाच्या खांद्यावर कवचितच दिसून येतो समाज सुधारक राजे अनेक होऊन गेले परंतु समाज क्रांतिकारक राजे शोधून सापडणे कठीण असा दुर्मिळ राजा होने इतके मोठे कार्य राजश्री शाहू महाराजा कडून घडले म्हणून त्यांचे नाव आजही सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. आणी पुढे ही राहील छत्रपती शाहू महाराजा सारखा सखा बहुजना पूर्वी लाभला नव्हता आणि पुढे लाभेल का यात शंका आहे. बहुजनानी राजश्री शाहू महाराजांची जयंती दिवाळी प्रमाणे साजरी करावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. अशा या राज्याला विनम्र अभिवादन शेवटी
या कार्यक्रमाचे शेवटी माने सरांनी आभार मानले. यकऱ्यकामाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव पवन वाघमारे यांनी केले. या जयंती कार्यकमाच्या शेवटी धम्मपाल गाथा होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

