पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गून्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी स्वारगेट पो स्टे गु र न 142/2023 भा द वि क 307, 341, 506(2), 34. आर्म अक्ट 325), 4(25) म पो अधि क 37(1)(3) सह 135 तसेच महाराष्ट्र पत्रकार अधि 2017 चे कलम 4 या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दाखल गुन्ह्यातील मास्टर माईंड व पाहिजे आरोपी सुरज देडगे रा नांदेड फाटा पुणे हा नांदेड फाटा हॉटेल पंगत येथे येणार असल्याची माहिती सपोनि वैशाली भोसले यांना मिळाल्याने सदरची माहिती युनिट 2 प्रभारी श्री क्रांतिकुमार पाटील सौ यांना कळविली असता त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सपोनि वैशाली भोसले व युनिट 2 कडील स्टाफ असे सदर ठिकाणी जाऊन पाहणी करीत असताना मिळालेल्या बातमीतील इसम हॉटेल पंगत नांदेड फाटा येथे थांबलेला दिसला त्यास स्टाफ चे मदतीने ताब्यात घेऊन त्यास आमची ओळख सांगून त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुरज रमेश देडगे वय 28 वर्ष रा स न 56/6 दुर्गा निवास बिल्डिंग श्री स्वामी समर्थ नगर नांदेड फाटा पुणे असे असल्याचे सांगितले त्याचे कडे दाखल गुन्ह्या बाबत चौकशी करता त्याने पत्रकारला मारण्याची सुपारी आरोपी नामे श्रेयस मते यास दिल्याचे कबूल करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील तपास कमी स्वारगेट पो स्टे च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री. सुनील पवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली , स.पो.नि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे पोलिस हवालदार नामदेव रेणूस , उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, संजय जाधव, शंकर नेवसे, उत्तम तारू, साधना ताम्हाणे, अमोल सरडे, पुष्पद्र चव्हाण, समीर पटेल, निखिल जाधव, यांनी केलेली आहे.

