रविंद्र भदर्गे,जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- साऊथ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉयज संघ जालना शाखेचे वतीने शहरातील रेल्वे रुग्णालयात शनिवारी बहुउद्देशीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शेकडो रूग्णांची तपासणी व सल्ला मोफत देण्यात आला.
साऊथ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉयज संघ जालना शाखेचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात 180 रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी जालना शाखाचे पदधिकारी बालाजी दवंडे, मनोज कुमार निराला, सचिन गोदाम, सागर यमले, मदन मोतीराम यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी नांदेडचे डॉ.नारायण स्वामी, डॉ.वेणू गोपाल रेड्डी, चीफ फार्मासिस्ट बाव सिंग, लक्ष्मण शंकर, तुषार कमलेश, मुकेश मीणा सह मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

