उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापुर/हुपरी:- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाने अठरापगड जातींना एकञीत ठेवले. संविधान पाठीशी आहे म्हणून देशात शाशंक वातावरण असतांना देखील सर्व जातीधर्माचे अस्तीत्व अबाधित आहे. म्हणून संविधान वाचविण्यासाठी सर्वानी एकञीत यावे असे प्रतिपादन मराठा समाज हुपरी सेक्रेटरी अजित उगळे यांनी येथे केले. ते तथागत ग्रूप संघटना व दैनिक सेवाशक्ती टाईम्सच्या वतीने आयोजीत केलेल्या भव्य राज्यस्तरीय पूरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक नेते तथा मराठा समाज हुपरी सेक्रेटरी अजित उगळे हे होते. या पूरस्कार वितरण सोहळ्याला प्रमूख अतीथी म्हणून तथागत ग्रूपचे अध्यक्ष संदिपभाऊ गवई, जयदीप सरवदे, जिल्हाध्यक्ष शिवबांचा माळवा, युवा उद्योजक योगेश म्हेतर, युवा नेते, प्रदीप बावचे, रोहित भोरे, प्रतीक पांडव, वैभव माने, प्रवीण सनदि, संदीप कोळी, प्रशांत आवळे, जिवन नवले, विकास साखळकर, महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष अनिकेत पवार, सुर्यकांत खेतले, कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष अरून कदम, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे, शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे, कोल्हापूर जिल्हा युवाध्यक्ष सचिन लोखंडे, रघु कांबळे, लक्ष्मण कांबळे, आकाश कांबळे, बाळू पाटील, आतिष शिखरे व सौ.पुजाताई भाकर तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.निता संदिप गवई, महाराष्ट्र शिक्षण सेल अध्यक्ष कोमल शिखरे, शिराळा तालुका अध्यक्ष मीराताई कांबळे आदि मान्यवर प्रामूख्याने उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांना राज्यस्तरीय महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पूरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. सर्व मान्यवर प्रामूख्याने हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुजाताई रेंधळे यांनी केले तर प्रस्ताविक पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी मानले. सर्व पुरस्कार प्राप्त झालेल्या विशेष मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
राज्यभरात कला, साहित्य, समाजसेवा, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सेवाव्रत्तींचा यावेळी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व विशेष दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम विभागातुन आलेल्या तथागत ग्रुपच्या सर्व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

