उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ येथील कंत्राटी आरोग्य सेवकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध काम बंद आंदोलनाची अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ आणि ठेकेदार डि.एम.एटरप्रायजेस यांनी दखल घेऊन कंत्राटी आरोग्य सेवकांच्या मागण्या मान्य कले त्या मध्ये प्रामुख्याने चालु जुन महिन्यातच पगार वाढ करून देणार असल्याचे आणि विमा तसेच इ.एस.आय ची सुविधा, आरोग्य सेवकास कामा वर लागणारे साहीत्य इत्यादी सर्व मागण्या मान्य केल्याने काम बंद आंदोलनास स्थगिती देण्यात आले.
त्यावेळेस संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी, यांनी कंत्राटी आरोग्य सेवकांची आणि जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांची प्रशंसा करत म्हणाले कुठल्याही कामगारांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांनी सेवक कामगार संघटनेच्या आधिकृत पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा सेवक कामगार संघटनेकडून त्यांना भारतीय संविधानिक मार्गानेच न्याय मिळवून देऊ आणि प्रत्येक कामगारांच्या पाठिशी एक सक्षम पर्याय म्हणून सेवक कामगार संघटना राहील अशी ग्वाही दिली त्यावेळेस ठेकेदाराकडून डि.एम एटरप्रायजेसचे प्रतिनिधी म्हणुन राहुल माने, जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाउपाध्यक्ष हरीश वाघमारे, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत कांबळे, वंदना सुभाष कांबळे, प्रमिला माणिक जामदाडे, अनिता रावसाहेब कुंभार, नंदा शंकर जावीर, गणेश मल्हारी केंगार आदि उपस्थित होते.

