हनिशा दुधे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील कोठारी गावालगत असलेल्या जंगल परिसरात नेहमी जंगली प्राण्याचा वावर असते. कधी ये जंगली प्राणी गावात येतात. त्यामुळे जंगली प्राणी आणि मनुष्यात जीवन जगण्यासाठी युद्ध आज नित्याचे झाले आहे. त्यात प्राण्यांना अन्न, आसरा आणि जागा असेल तर ते मानवी वस्ती मध्ये हल्ला करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे माणसे आणि वन्य प्राणी एकत्रितपणे शांततेत राहतील असे वातावरण तयार होणे आवश्यक आहे.
अशातच कोठारी गावात मानवी वस्तीत आलेल्या एका चीतळाला कुत्रानी जखमी केले. यांची माहिती परिसरातील नागरिकांनी सेव्ह फॉरेस्ट सेव्ह चंद्रपूरच्या सदस्यांना देण्यात आली. माहिती मिळताच संस्थेचा सदस्यांनी यांची माहिती वनविभागाला दिली त्यानंतर वनविभागाची टीम तडकाफडकी घटनास्थळी दाखल होऊन चितळाची मदतीला धावून आले.
यावेळी कोठरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे, फॉरेस्ट गार्ड सिध्दार्थ कामडे व सेव्ह फॉरेस्ट सेव्ह चंद्रपूरचे अध्यक्ष संतोष चौहान, उपाध्यक्ष ॲड. रंनाजय सिंह, सचिव सतिश नाईक, सहसचिव विक्रांत पंडीत, सुनील वाडगुरे, सुरज वाघमारे उपस्थित होते.

