Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयात 26 कोटीचा भष्ट्राचार, लिपिकला अटक, जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 30, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात 26 कोटीचा भष्ट्राचार, लिपिकला अटक, जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लातूर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- जिल्हाधिकारी कार्यालयातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे कोट्यवधींचा भष्ट्राचार झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. लातूर येथील महसूल विभागातील एका लिपिकाने शासनाच्या विविध योजनांच्या सरकारी निधीतून केलेल्या घोटाळ्यात घटना आता बाहेर येत आहेत. या घोटाळाची एकूण रक्कम 26 कोटीची असल्याची माहिती समोर आली आहे. या भष्ट्राचार प्रकरणी आरोपी लिपिकाला अटक करण्यात आली असली तरी, मात्र जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यांच्यावरही गुन्हे का दाखल केले नाहीत असाही प्रश्न विचारला जात आहे.लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे याने मागील सात वर्षात तब्बल 26 कोटी रुपयेचा अपहार केल्याची माहिती उघड झाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मनोज नागनाथ फुलेबोयणे याच्यासह इतर पाच जणांना अटक ही करण्यात आली आहे.

औसा तहसील कार्यालयात कार्यरत असताना मनोज फुलबोयाने याने वेळोवेळी आर्थिक अपहार केला असल्याचं माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने मनोज फुलबोयाने याच्या भावाच्या नावावर असलेल्या तन्वी ॲग्रोला चार धनादेशाद्वारे 88 लाख रुपये देण्यात आले. प्रकरणाची चर्चा झाल्यावर ते परत तहसील कार्यालयाच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात आले. मात्र औसा येथील तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी तनवी अग्रो बरोबर कोणताही व्यवहार नसताना चार धनादेशावर स्वाक्षरी कशी केली? गुन्हा दाखल न करताच पैसे परत खात्यात कसे घेतले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

माहिती अधिकारातून फुटले बिंग….. माहिती अधिकार कार्यकर्ता मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती अधिकारातील कागदपत्रावरून अनेक बाबी समोर आले आहेत. एकमेव लिपिकच नव्हे तर अनेक जण यामधील गुंतले आहेत. त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या धनादेशामुळेच हा निधी ज्या फर्म बरोबर कोणताही व्यवहार नसताना त्याला निधी गेलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सदरील गैरप्रकार करणारा जेवढा दोषी आहे तेवढेच हे अधिकारीही दोषी आहेत यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता मल्लिकार्जुन भाई कट्टी यांनी केली आहे.

सहा अधिकाऱ्यांना नोटीस… जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून मनोज फुलबोयने यांनी सात वर्षात तब्बल 26 कोटीच्या वर अपहार केल्याची माहिती समोर आल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली होती. या सात वर्षाच्या काळात कार्यरत असलेले तत्कालीन सहा तहसीलदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आता त्यांच्यामागे खातेनिहाय चौकशी लागली आहे.असा सुरू होता घोटाळाहा प्रकार 2015 ते 2022 असा एकूण सात वर्षांतील असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश काढल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या वर्षी जानेवारीत सर्व प्रकरण उघड झाले आहे. याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? महसूल शाखेतील तत्कालीन लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्याकडे बँक खात्याचा कारभार होता. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश होता. जलसंधारण अधिकाऱ्यांना दोन धनादेश देण्यात आले होते. ज्यामध्ये 12 लाख 27 हजार 297 रुपये आणि 41 लाख 06 हजार 610 रुपये आरटीजीएसद्वारे वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शाखेत आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आले होते. मात्र, खात्यात केवळ 96 हजार 559 रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. यामुळे अपहार प्रकरणाचे धागेदोरे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी खात्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले. तसेच अन्य एका खात्याचेही लेखापरीक्षण करण्यात आले. ज्यामध्ये स्वाक्षरी आणि मूळ रकमेत बदल केल्याचे निदर्शनास आढळून आले. शासकीय खासगी खात्यात वर्ग केल्याचे निदर्शनास आले.

कसा केला घोटाळा? मनोज फुलेबोयणे या लिपिकाने बनावट प्राधिकारपत्र तयार केली. अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन शिक्क्यांचा गैरवापर केला. त्यातून कोट्यवधी रुपये भाऊ अरुण प्रोप्रायटर असलेल्या तन्वी कृषी केंद्र, तन्वी अॅग्रो एजन्सीज आणि ऋषीनाथ ॲग्रो एजन्सीजच्या बँक खाते तसेच सुधीर देवकते आणि चंद्रकांत गोगडे यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. यासोबत धनादेशातील अक्षरी, अंकी रक्कमेच्या ठिकाणी रिकामी जागा ठेऊन त्यानंतर त्यात वाढ करुन रक्कम लाटली. तर या प्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनोज नागनाथ फुलेबोयणे याच्याविरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे अशी आरोपींची नावं आहेत.

Previous Post

Мостбет Бк Mostbet Букмекерская Контора Регистрация Бонус Обзор официальным Сайт

Next Post

जालना: मुल होत नाही म्हणून लग्नाच्या 13 वर्षांनंतर पत्नीची कारसह जिवंत पेटवून हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जालना: मुल होत नाही म्हणून लग्नाच्या 13 वर्षांनंतर पत्नीची कारसह जिवंत पेटवून हत्या.

जालना: मुल होत नाही म्हणून लग्नाच्या 13 वर्षांनंतर पत्नीची कारसह जिवंत पेटवून हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In