रवींद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी खळबळजनक घटना त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज आपण 21 शतकात वावरत आहोत तरी पण महिलेवर सासरच्या कडून अत्याचाराचे प्रमाण कमी झाले नाही. त्यात विवाहित महिलाच हुंडा साठी बळी घेतला जातो तर कधी मूल होत नाही म्हणून सूनेचा छळ केला जातो. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे.
मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा परिसरात 24 जून रोजी एका कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या घटनेत मोठा खुलासा समोर आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती.
मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने नराधम पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती.
याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
आरोपीचा बनाव….
शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परत येत होतो त्यावेळी कारला मंठा- लोणार रस्त्यावर 23 जूनच्या पहाटे अपघात झाला. पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने कारला आग लागली. या आगीत कारमध्ये बसलेल्या 32 वर्षीय सविता सोळुंके हीचा जळून मृत्यू झाला होता. असे पतीने पोलिसाना माहिती दिली. पण आता पतीनेच पत्नीला जिवंत जाळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सविता यांच्या भावाला संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अमोल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याचा संशय खरा ठरला. मंठा पोलिसांनी अमोलला अटक केली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

