✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.30 जून:- तालुक्यातील वडनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या तर्फे वडनेर ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप वृक्षारोपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसद रत्न खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवस निमित्त हिंगणघाट तालुक्यातील वडनेर ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडूनिंब, जामुन करंजी असे वृक्ष लावण्यात आले,
त्यानंतर वडनेर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळ वाटप करण्यात आले. गुरुदयालसिंघ जुनी मित्रपरिवार तर्फे हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपस्थित गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत दरोडे, नानाभाऊ माणिकपुरे, अमोल चंदनखेडे, शरद कुरसंगे, अतुल धाडवे, हिरामण सुरकार, विजुभाऊ लाटकर, अक्षय झुनघरे, आकाश अडाल, प्रकाश ठाकरे, प्रशिक खैरे, आदेश तेलतुंबडे, विजुभाऊ कटारे, वैभव हुलके, गजू बोरकर, अविनाश भाऊ भगत, राजू कुरसंगे, नितीन झांबरे, रुग्णालय इन्चार्ज डॉ. एम.एस. पाटील, डॉक्टर मून साहेब, सिस्टर कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

