उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन सांगली:- जिल्हातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे नव विवाहित पती पत्नी ने विषप्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही मन हेलावणारी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावी येथून समोर आली आहे. राज संजय जाधव वय 23 वर्ष आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव वय 20 वर्ष असे विष प्राशन करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. या नवविवाहित का विष प्राशन केलं यांचं कारण अजून समोर आले नाही.
प्राप्त माहितीनुसार मृतक राज जाधव आणि ऋतुजा जाधव याच लग्न 11 महिन्यांपूर्वी रीती रिवाजाने झाल होत. राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते. राज यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होत्या. ऋतुजा, राज यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे सर्व एकत्रित कुटुंबात राहत होते.
जाधव कुटुंबियांनी बुधवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले आणि इतर कुटुंबीय दुसऱ्या खोलीत झोपी गेले. रात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरुममधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू आला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरूम कडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना राज आणि ऋतुजा हे विषारी औषध प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून तासगांवातील डॉ. जाधव हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तासगांव ग्रामीण रुग्णालय इथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत.
नवविवाहित दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

