पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २७/०३/२०२३ रोजी रात्रौ २२:०० चे सुमारास फिर्यादी नामे रोहित अशोक खंडाळे, वय २४ वर्षे रा स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु. पुणे हे साईनगर गल्ली नं ०२ येथे फिरत असताना आरोपी नामे १) मंगेश माने, २) सागर जाधव, ३) पवन राठोड, ४) सुरज पाटील व ५) अभिजीत दुधणीकर यांनी फिर्यादी हे त्यांचा मित्र वैभव साळवे याच्या बरोबर फिरतात या कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडील लोखंडी धारदार कोयत्याने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये.. डावे हाताचे बोटावर मनगटाखाली उजव्या हाताचे दंडावर वार करून गंभिर जखमी केले म्हणून यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ३२७ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३२३,३२३, ५०४, १४३, १४७, १४८ शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ तसेच मोक्का कायदा कलम ३ (१)(ii)३ (२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता..
सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व अंमलदार यांनी सदर आरोपीतांचा शोध घेवून यातील आरोपी नामे १) सागर जाधव, २) पवन राठोड, व ३) अभिजीत दुधणीकर यांना यापुर्वी अटक केली होती. परंतु आरोपीतांचा म्होरक्या मंगेश माने हा सतत पोलीसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्यामुळे पुणे शहर पोलीस दल त्याचा शोध घेत होते. सदर आरोपी व त्याच्या मित्रांनी कोंढवा, बिबवेवाडी, भारती विद्यापिठ, गार्केटयार्ड या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करून स्वतःची व स्वतःच्या एम.एम. गंगची दहशद निर्माण केली होती.
दि. २७/०६/२०२३ रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व अंमलदार है हद्दीमध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी च्या अनुषंगाने हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार/४९० सुरज शुक्ला व पोलीस अंमलदार / २१८५ सुजीत मदन यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंगेश माने हा गोकुळनगर पाण्याचे टाकी जवळ येणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७९ निलेश देसाई पोना/ ७७८२ जोतिबा पवार, पोना / ८४८६ गोरखनाथ चिनकें पोअं/१०११६ सागर भोसले, पोअं/ ८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं / ९८.३८ संतोष बनसुडे, पोअं/ २१८५ सुजित मदन, पोअं.४९० सुरज शुक्ला व पो.अ./ ४८४५ अनिल बनकर यांनी सापळा रचून आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या यय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. सदर आरोपी व त्याच्या टोळक्याची दहशद मोडून काढण्याकरीता कोंढवा पोलीसांनी त्याची गोकुळनगर भागामध्ये धिंड सुद्धा काढली आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त सो रितेश कुमार यांच्या आदेशान्वये तसेच सह पोलीस आयुक्त, संदीप कर्णीक, व अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग रंजन शर्मा, ना.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री शाहुराव साळवे. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री संतोष सोनवणे, गा.पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले व मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७२ निलेश देसाई पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोना/ ७७८२ जोतिबा पवार, पो.अ./ २१८५ सुजित मदन, पो. अं / ९८३८ संतोष बनसुडे, पो.अ./ ८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं. / १०११६ सागर भोसले, पो.अं. ४९० सुरज शुक्ला व पो अं /४८४५ अनिल बनकर यांच्या पथकाने केली आहे.
