मारोती महाकाळकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांच्या वतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 15 दिवसाआधी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य शाखा – वर्धा जिल्हाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दि. २० जून २०२३ ला दिव्यांग बांधवाचे संजय गांधी निराधार योजने मधील पेंशन बंद केल्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. पण त्याची दखल उपविभागीय कार्यालय हिंगणघाटने घेतली नाही. त्यामुळे त्यांचे निषेधार्थ आज दि. ७ जुलै २०२३ ला तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
त्या आंदोलनाची दखल तहसिलदार हिंगणघाट यांनी घेतली. दिव्यांगाची पेंशन बंद या विषयावर तहसिलदार सोबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जगदीश देवतळे, वनिता भजभुजे, गोपाल कांबळे, शरद नांदे, श्याम ईडपवार, गजु कुबडे, रूपेश लाजुरकर, हर्षल बोंडे यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली. यावेळी तहसिलदार यांनी दिव्यांगाची पेंशन जी बंद झालेली आहे. शासन निर्णयाप्रमाणे पुर्ववत चालू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
मागील तीन महिण्यापासून या विषयावर राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी जिल्हा प्रशासन मधील अधिकारी व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून या विषयाचा सतत पाठ पुरावा केला होता. तसेच कोल्हापुर पश्चिमचे आमदार ऋतुराज पाटील यांनी बजट अधिवेशनमध्ये लक्षवेधी लावून दिव्यांगाच्या संजय गांधी पेंशन बंदीच्या विषयावर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला. या दोन्हीही नेत्याचे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य यांचे मनापासून आभार मानत आहे.
या आंदोलनाच्या वेळी जगदीश देवतळे, दिलीप पुनासे, सचिन भजभुजे, शरद नांदे, सतिश गौळकर, प्रविण कावळे, अनंता निमजे, सुरेश श्रावणे, सुर्यकांत कळमकर, बाबुलाल लोखंडे, अशोक धुर्वे, गुड्ड कावळे, रुपेश चंदनखेडे, आकाश भोकरे, रामचंद्र सहारे, वनिता भजभुजे, विणा पुनासे, सिमा निमसरकार, वैशाली रायपुरे, अन्नपुर्णा निमसरकार आधी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

