आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील समता सैनिक दल द्वारा संचालित बल भीम व्यायाम शाळेत दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरूचे स्थान लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्येक्रमाची सुरुवात प्रथम गुरु तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे, रमेशजी डांगे, दिगांबरजी लांबे, मारोतराव डंभारे पैलवान, तालुका संघटक मनोज थूल, प्रदीपजी कांबळे हे होते. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते डंभारे यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन गुरुच्या नात्याने सत्कार करण्यात आला.
डंभारेजी हे गुरु म्हणून बलभीम व्यायाम शाळेत मुलांना कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देतात. त्यांच्या हातून आज अनेक मुलं तयार झालेले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे मुले व्यसनापासून परावृत्त होत आहेत. त्यांना व्यायामाची सवय लागली आहे. डंभारे यांनी समाजात तरुणांपुढे आपला एक वेगळं स्थान निर्माण केल आहे. त्यांच्या कार्यची दखल घेऊन समता सैनिक दलाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष तसेच मान्यवरांनी जीवनातील ‘गुरुचे महत्व ‘याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फुल सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदीप मेंढे यांनी मानले. यावेळी शिवम जाधव, श्रेयश कस्तुरे, यश, कुणाल वालदे, समर्थ लोखंडे, शंकेश पाटील काशिनाथ आगलावे, दिलीप वानखेडे, प्रदीप मेंढे , देवेंद्र धावणे, रुपेश धनवीज, अवधूत पवार, गजानन जाधव, हर्षल वालदे, महेश भाऊ, आयुष भाऊ, ऋतिक गुजरकर, सारंग ढोबळे, तायडे सर, सुधाकर शंभरकर, भगत, रोशन कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

