प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डांगरी वॉर्ड परिसरातील गल्ली मध्ये जो सिमेंट रस्ता गेला त्या रस्त्याचा मधोमध विद्युत खांब असल्याने तेथून कोणते वाहन ये – जा करू शकत नाही. तेथील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेथील लोकांना घराचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचं असले की कोणतेही तीन चाकी घरापर्यंत येत नाही अशा अनेक छोट्या – मोठे वाहन आहे की या विद्युत खांबामुळे येत नाही तसेच या विद्युत खांबामुळे परिसरात अनेक समस्या आहेत या समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि यातून येथील लोकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे अशी मागणी येथील नागरिकांनी उप कार्यकारी अभियंता महा.राज्य विद्युत वितरण कंपनी यांना केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, पुरुषोत्तम कांबळे, मंदनजी मुसळे, सुशिल घोडे, गजु महाकाळकर, गोपाल जोडांंगडे, रोहित लेदे, आकाश हुरले, कार्तिक चतुर, अवदुत मूसळे, रोशन आंबटकर, दरश मुसळे, संकेत चाडगे, अनिल फाले, सागर हुरले, शुभम चतुर व डांगरी वार्डातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

