पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे व पुणे शहर परिसरातील खुन, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना अटक करुन प्रतिबंध कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे शहर परिसरात गुन्हे शाखेतर्फे कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग, नाकाबंदी,सराईत गुन्हेगारांची चेकींग मोहिम कारवाई सुरु करण्यात आली होती.
दिनांक ०७/०७/२०२३ रोजी चालेवाडी, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्धुन खुन करण्यात आला होता. त्याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३०१ / २०२३ भादविक ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेणेकरीता मा. पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे सो. गुन्हे पुणे शहर यांना सुचना केल्या होत्या.
दिनांक ०८/०७/२०२३ रोजी गा. सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर सौ गुन्हे २. पुणे शहर यांना नमूद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) वनीस प्रल्हाद परदेशी, रा.४०४, गुरुवार पेठ, पुणे मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे २) महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी वय ६५ वर्षे रा. ढालेवाडी, बंद वस्ती, जेजुरी, पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा ( अटक) हे दोघे जण डेक्कन परिसरात येणार आहे अशी गोपनीय बातमी मिळाली.त्याअनुशंगाने मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक- २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सदोबा भोजराव, चेतन अपाने, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून नमूद आरोपीतांचा डेक्कन परिसरातून शोध घेवून त्यांना पकडून नमूद आरोपीतांकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाले. आरोपीतांनी त्यांचे इतर साथीदारासह वरील नमूद गुन्हा केला असल्याचे कबुली दिली आहे नमूद आरोपीतांना पुढील कारवाई कामी जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे). श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सदोबा भोजराव, चेतन अपादे प्रदिप गाडे, पवन भोसले यांनी केलेली आहे…

