मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पेरमिली – राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या कडून, राज्याचे नव्याने कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले नामदार धर्मराव बाबा आत्राम यांना आदिवासी समाजाचा पारंपरिक वस्तु (रेकी), पिवळा गमचा, पुष्पा गुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, राजारामचे माजी सरपंच विनायक आलाम, सामाजिक कार्यकर्ता बाबुराव तोरेम, मेडपल्लीचे ग्रा. पं. सदस्य यशवंत कोडापे, राजारामचे माजी ग्रा. पं. सदस्य सुर्यकांत आत्राम, बाबुराव तलांडी, अनिल दुर्गे, देवाजी सडमेक, सुनील दुर्गे, लक्ष्मण मडावी, अमर गावडे, मंगेश आत्राम, तिरुपती मडावी, योगेश तलांडी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

