आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील गिरड येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील जंगल परिसरात सस्याची शिकार करणे दोन व्यक्तीला जीवावर बेतले. विद्युत करंट लागून दोन व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिरसात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सशांची शिकार करण्यासाठी शेत शिवारात गेलेल्या दोघांचा विद्युत करंट लागून जीव गेल्याची धक्कादायक घटना गेली आहे. या घटनेत दोघे जण थोडक्यात बचावले. वर्धा जिल्ह्यातील गिरड गावात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गिरड पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे.
शेतकरी अनिल गौरकर याने स्वत:च्या शेतात पिकांच्या सरक्षणासाठी शेता सभोवताल तार लावून त्याला वीजप्रवाहीत केली होती. रात्री 9 वाजताच्या सुमारास उत्तम संभा जाभुळे, अखिल वासुदेव बावणे, बादल खडसे, विकास नन्नवरे हे त्यांच्या शेतात जंगली संशाची शिकार करण्यासाठी शिकारीचे जाळे व टॉर्च घेऊन गेले होते. शेतासभोवताल वीजप्रवाहित तार लावले असल्याची त्यांना कल्पना नव्हती. समोर उत्तम जांभुळे व अखिल बावणे हे दोघे होते. तर दोघे जण काही अंतरावर त्यांच्या मागून येत होते. उत्तम व अखिल हे दोघेही शेताकडे जात असतानाच त्यांचा वीजप्रवाहीत तारेला स्पर्श झाला आणि दोघेही जोरात किंचाळले. ओरडण्याचा आवाज येताच मागून येत असलेले बादल खडसे, विकास नन्नवरे यांनी धावत जात वीजप्रवाह बंद केला.
घटनेची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल दहिभाते यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी शेताच्या सभोवताल पीक सरंक्षण साठी विद्युत तार लावल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असता त्यांनी शिकारी जाळे, बजर लाईट बॅटरी, टेस्टर आदी साहित्य जप्त केले. जमादार पंचम कोडगिलवार, कृष्णा हुरले यांनी पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी शेत मालक अनिल गौरकर याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

