डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चिंचवड:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात आगळ वेगळं आंदोलन राबवलं जात आहे. राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडीवर मनसेतर्फे सह्यांची मोहीम राबवली जात आहे. सध्याच्या परिस्थितीचा राजकारणाचा चिखल बघता सामान्य माणसाचे किती घोर फसवणूक होत आहे. ज्या व्यक्तीला मतदान केले असती व्यक्ती कुठे आहे, या सर्व गोष्टीचा संताप व्यक्त करण्याकरिता ही मोहीम सामान्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी आहे. असे मनसेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले म्हणाले.
एक सही संतापाची हाच उपक्रम रविवार (दि.९) जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चिंचवड येथील चाफेकर चौकात आयोजित करण्यात आला होता. अभिनयाद्वारे मनसे कडून राजकीय घडामोडीचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणी, सामान्य नागरिक, गृहिणी, रिक्षा वाले, व्यावसायिक आधी मोठ्या संख्येने सह्या करत होते. सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्या साठी नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. त्याचा राज ठाकरे च्या प्रतिविश्वास अजूनही वाढलेला आहे.
एक सही संतापाची या उपक्रमातून अस दिसत आहे की, भविष्यात राज ठाकरे यांनीच महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकां कडून पहायला मिळाली. माझ्या मताला किंमत नाही का? मतदानाला गृहीत धरणार का? अशा पद्धतीचे सवाल या उपक्रमात नागरिकां कडून उपस्थित करण्यात आले आहेत. नागरिक या फलकावरून सही करून चाललेल्या राजकीय नाट्यवर्धन आपला संताप व्यक्त करत होते.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन मनसे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी केले होते. यावेळी मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमंत डांगे, दत्ता देवतारासे, नितीन चव्हाण, आकाश सागरे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमात नागरिकांनी भरभरून उत्तम प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

