✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वंचित बहुजन आघाडी आणि विविध संघटना व बौद्ध मंडळाच्या वतीने वर्धा जिल्हा कचेरीवर विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अलीकडे बौद्ध मातंग व मुस्लिम समाजातील तरुणाच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या. यामुळे या समाजात फार आक्रोश निर्माण झाला असून शासनाने फास्टट्रॅक कोर्टात खटले चालवून पिडितांना न्याय मिळवून द्यावा, दोषींना फाशीची शिक्षा मिळावी पीडित कुटुंबातील एका शासकीय नोकरी व रुपये 50 लाख लाखाची भरपाई द्यावी आणि अशा घटनांना पायबंद घालावा या मागण्या घेऊन गुरुवार दिनांक 13 जुलैला दुपारी 12.00 वाजता वर्धा जिल्हा कचेरीवर विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संबंधाने दिनांक 7 जुलैला शासकीय विश्रामगृह वर्धा येथे बौद्ध व मुस्लिम समाजातील विविध संघटना संस्था मंडळे यांच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. यात प्रामुख्याने किशोर खैरकार, मज्जित भाई कुरेशी, निरज गुजर, डॉ. सिद्धार्थ बुटले, मधुकर वानखेडे, महेंद्र मुनेश्वर, आशिष सोनटक्के, मनोज वरखडे, आसिफ खान, बाबा अखिल, उत्तम चव्हाण, सिद्धार्थ डोईफोडे, प्रियदर्शनी भेले, अशोक मोरे, वैशाली पाटील, अरुण वाघमारे, शारदा झांबरे, मंगेश सराटे, ऍड.अब्दुल सलीम, आशिष गुजर, अशोक रामटेके, कुणाल वासेकर, अशोक भाले, मंगला कांबळे, रवी कांबळे, गुड्डू कांबळे,लोमेश बोबडे, सिद्धार्थ जामूनकर, फिरोज खान,महादेव शेंडे, दिगंबर पलटणकर, वसंत मुरारकर, अंजली शिंदे, अमोल कोल्हे इत्यादी सहित मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर बैठकीत वंचितचे जिल्हा प्रभारी इंजिनियर बंडूभाऊ नगराळे व डॉ. रमेश गजबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदेड येथील अक्षय भालेराव या तरुणाचा आंबेडकर जयंती मिरवणूक काढल्याने निर्घृण खून करण्यात आला, परळी येथील जरीन खान या युवकाचा पोलीस कस्टडीत थर्ड डिग्री टॉर्चरने खुण करण्यात आला त्यामुळे आंबेडकरी समाजात व मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली असल्याने या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती राहील यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी शहरातील सर्व बौद्ध मंडळांशी संपर्क करण्यासाठी व शिस्तबद्ध मोर्चा निघण्यासाठी तीन समितीचे गठन करून त्यांना कार्यरत करण्यात आली आहे. सदर बैठकीचे प्रास्ताविक आणि संचालन डॉ. सुभाष खंडारे यांनी तर आभार प्रियदर्शना भेले यांनी केले. सदर विराट आक्रोश मोर्चा बजाज चौक वर्धा येथून प्रारंभ होऊन जिल्हा कचेरीवर जाणार आहे. तेव्हा सर्वांनी ठीक 12.00 वाजता बजाज चौक येथे जमावे असे आवाहन समितीने केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

