✍️ अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- स्थानिक गणेश नगर बोरगाव (मेघे) येथील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून लोकप्रतिनिधीं व प्रशासनाचा नागरिकांनी केला निषेध. गणेश नगरातील हा मुख्य रस्ता असल्यामुळेच जड वाहने याच रस्त्यातून धावतात. त्यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याच मार्गाने असंख्य शाळकरी विद्यार्थी शाळेत शाळेकरिता वाहनाने ये- जा करीत असतात. त्या ठिकाणाहून वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. आता त्यात पावसाळ्याला सुरुवात झाली असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचून अपघाताला आयतेच निमंत्रण मिळणार आहे. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चिखल तुडवी वाटचाल करावी लागते आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढीस लागलेले आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढत असून वाहन चालकांना वाहने व्यवस्थित बाहेरही काढता येत नाही अशी चाळण झाली आहे.यात अपघातग्रस्त वाहने क्षतीग्रस्त होऊन अनेक वाहन चालकांना मानेचा, पाठीचा, मणक्याचे ,कंबरेचा त्रास होत असल्याची ओरड आहे.
यासर्व बाबीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात लोकप्रतिनिधी साधी दखल घ्यायला तयार नाही यापेक्षा दुर्दैव कोणते असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झालेली असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण वातावरण आहे आहे तेव्हा संबंधित रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे अन्यथा नागरिकांकडून जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी राधेशाम पाटील, सुरेश इखार, शंकरराव चौधरी, हनुमानजी पिसे, रविद्रभाऊ कटाईत संजय लाटकर, संजय भगत, नामदेव दुमने, नामदेव इलायतकर, पुंडलिक पोराटे सह अनेक नागरिक उपस्थित होते.

