सुधीर जगताप पुणे शहर प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 725/2023 भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट 2 कडून समांतर तपास करीत असतांना पोना 1923 आतिष कुडके व पोकॉ 1931 शिवाजी मुंढे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन आरोपीत नामे ऋृषीकेश बाजीराव महानवर वय 22 वर्षे धंदा- मजुरी रा. गोकुळ हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली पुणे यास चोरीचे मोटर सायकलींसह शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीत याने व त्याचा साथीदार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुढेकर रा. शरदनगर चिखली यांनी वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
खालील नमुद वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत-
1) पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 725/2023 भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे
2,) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 413/2023 भादवि कलम 379 प्रमाणे
वरील नमुद गुन्हयात 45000/- रुपये किंमतीची बजाज पल्सर मोटर सायकल नंबर एम एच 12 आरडब्लु 6901 व 25000/- रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम एच 12 एलएक्स 0913 अशी एकूण 70,000/- रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असुन पाहीजे आरोपीत याचा शोध सुरु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीत यास गुन्हयाच्याकामी पिंपरी पोस्टेच्या ताब्यात दिले आहे…
सदरची कार्यवाही गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस Asi शिवानंद स्वामी, पोलीस नाईक आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस अंमलदार अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली

