महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाइन धनबाद:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनींनी कपाळावर टीकली लावल्यामुळे शिक्षकांनी तिच्या कानाखाली लावली. याच कारणाने तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उषा कुमारी या विद्यार्थिनींने कपाळावर टीकली लावल्यामुळे तिच्या शिक्षका सिंधू ने सर्वासमोर तिच्या कानाखाली मारली. त्यामुळे या विद्यार्थिनींच्या आत्महत्या केली या प्रकरणी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोलीस कारवाईची सुरू आहे. आत्महत्या पूर्वी या विद्यार्थिनीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात शाळेत घडलेला संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेटुलमारी येथील सेंट झेवियर्स शाळेत शिकणारी मुलगी सकाळी शाळेत गेल्यानंतर थोड्यात वेळात परत आली. यावेळी ती खूप उदास होती. शाळेत गेल्यानंतर तिच्या शिक्षकांनी तिला टीकली लावल्यामुळे सर्वांसमोर कानाखाली मारली होती. यानंतर ती याची तक्रार नोंदवण्यासाठी मुख्यध्यापकांकडे गेली. मात्र त्यांनी देखील तिचे ऐकून घेतले नाही. यानंतर ती घरी आली. पुढे तिने सुसाईट नोट लिहून आत्महत्या केली.
संपूर्ण शाळेसमोर मला मारहाण करण्यात आली. मला शाळेतून काढून टाकलं आहे. माझी झालेली बदनामी मी सहन करु शकत नाही त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या या निर्णयाला केवळ शाळेतील सिंधू मॅडम जबाबदार आहेत असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. सिंधू मॅडमवर कारवाई करावी असं पुढे ती म्हणाली आहे. नातेवाईक आणि सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी शाळेतील शिक्षिकेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकेवर गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

