आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाहईन पुणे:- राज्यात राजकीय टीकेच्या भाषांची पातळी पार घसरली आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला अशी गत राजकीय नेत्याची झाली आहे.
सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या डौऱ्यावर आले होते त्यावेळी नागपुरात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत म्हटल होते की, देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आधी टिका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून टिका करण्यात येत आहे.
त्यात भाजपचे नेते नितेश राणे यांनी काल उद्धव ठाकरे यांचा आक्षेपार्ह फोटो ट्विट केल्याने तृतीय पंथीयांनी नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तृतीय पंथीय संघर्ष समितीने जोरदार आंदोलन देखील करण्यात आले.
जर तुम्हाला सोज्वळपणा शिकायचं असेल आणि हिजड्याची राहण्याची पद्धत शिकायची असेल तर आमच्यात येऊन राहा. आम्हाला नोकऱ्या द्यायला तुम्हाला जमत नाही. तुम्हाला आरक्षण द्यायला जमत नसेल. तर साडी घालून सिंग्लनवर दोन पैसे मागून पहा. तेव्हा तुम्हाला कळेल की हिजड्याचं कसं असतं. नितेश राणे निर्लज्जपणे माफी मागणार आहेत. कारण तो निर्धावरलेला आणि पुरूषी माज असलेला विचाराचा माणुस आहे. परंतु नितेश राणे कुठेही जरी दिसले तरी त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. अशी भूमिका तृतीय संघर्ष समितीने घेतली आहे.
कलंक केलेल्या टिकेनंतर नितेश राणे यांनी ट्विटवर उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टिका केली. मर्दानगीवर कलंक, हिजड्यांच्या प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा, बायला कुठला असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर टिका केली. याविरोधात तृतीय पंथीय समाजाचा अपमान केल्यामुळे नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत बंड गार्डनसमोर तृतीय पंथीयांनी आंदोलन केले.

