अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 12 जुलै:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले श्री. बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी द्वारा गुरु पोर्णीमा निमित्य पादुका दर्शन, श्री. बाबा ताजुद्दीन स्तोत्र सामूहिक पारायणाचा कार्यक्रम रविवारी 9 जुलैला तेजसिंगराव भोसले सभागृह नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड श्री.मिलिंदजी केदार यांनी सर्व भक्तांना ताजुद्दीन बाबा बद्दल संबोधित केले.त्यानंतर वाकी दरबार चे अध्यक्ष श्री.प्रभाकरजी डहाके पाटील यांच्या वाणीतून श्री.बाबा ताजुद्दीन स्तोत्राचे सामूहिक पारायण करण्यात आले.हजारो भाविकांनी सामूहिक पारायणाचा लाभ घेतला.पारायणा नंतर श्री.संत ताजुद्दीन बाबांच्या पादुकांचे दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली.भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला विशेष नागपूरचे श्रीमंत राजे रघुजी भोसले पंचम, श्रीमंत राजे जयसिंगजी भोसले हे सुद्धा प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

