आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य औद्योगिक मंडळाच्या वसाहतीत उद्योजकांना उद्योग टाकण्यासाठी सर्व त्या सवलती देत माफक दरात भुखंड दिल्या जातात. मात्र काही उद्योग सुरूच करीत नाही. बांधकामाचा पत्ताच नसतो. त्यांना वेळोवेळी मुदतवाढ पण दिल्या जाते. तरीही उद्योग उभारल्या जात नसल्याने हे तसेच पडून राहतात. इतर नव्या उद्योजकांना त्यामुळे संधी मिळत नाही. ही बाब एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निदर्शनास आणली. तसेच काहींनी प्राप्त भूखंडावर गोदाम उभारले. त्यामुळे रोजगार निर्मिती होत नसल्याचे स्पष्ट झाले. या बाबी जिल्हाधिकारी यांनी स्वतःआज पडताळल्या. त्यात चुकीचे होत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी अडवून ठेवलेले भुखंड परत घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
गोदाम उभारून नियमभंग केला म्हणून कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे हिवरे यांनी सांगितले. यामुळे ५० एकर पेक्षा ज्यास्त जागा नव्या उद्योगासाठी उपलब्ध होणार आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे. उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सुप्रिया बावनकुळे,व्यवस्थापक कमलेश जैन, सुशील गरुड, अभियंता रॉय व पाटील तसेच आयुष सिंघानिया, जगदीश पटेल हे पाहणी वेळी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

