हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दिलासग्राम कॉन्व्हेंट हायस्कूल, बल्लारपूरच्या वतीने इयत्ता 10 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विशाल वाघ मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून विरूरचे ठाणेदार श्री. जयप्रकाश निर्मल दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल मॅनेजर सिस्टर अगाथा, सिस्टर विनया, सिस्टर सौम्या, सिस्टर माऊली, सिस्टर फुलकुमारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित सर्व आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विशाल वाघ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विरूर येथील ठानेदार यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीने व संघर्षाने पुढे जाण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे संचालन सौ.पूनम शर्मा व सौ. बबिता नागदेवते यांनी केले तर आभार तालुका टॉपर व स्कूल टॉपर कु.आस्था उमरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

