पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २५/०६/२०२३ रोजी सध्याकाळी दोन अनोळखी महिला मॉडेल कॉलनी भागात जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने फिरत होत्या. यातील फिर्यादी यांना त्यांचे काही जुने कपडे विकणे असल्याने सदर महिलांना बोलावले असता आरोपी महिला यांनी मुक लागली आसल्याने आम्हाला जेवण मिळेल का अशी भावनिक साध घातली त्यानुसार फिर्यादी महिलेने त्यांना घरात बोलावून जेवण दिले. जेवण करत असताना आरोपी महिलांनी घरातील वस्तुंची रेकी केली व जेवण संपवून बाहेर गेल्या. फिर्यादी महिला बाहेर जाण्याची वाट पाहत घराबाहेर लपून बसले. फिर्यादी महिला बाहेर गेलेचे पाहताच त्यांनी पुन्हा घरात प्रवेश करून सोन्याची दोन अंगठी, एक मोबाईल व रोख रक्कम ६०,०००/- रुपये असे १,२०,०००/- रुपयाचे एवेज पेटीतुन काढुन आरोपी महिला पसार झाले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १२४ / २०२३ भादवि कलम ३८०.३४ महिलेची फिर्याद घेवून गुन्हा दाखल करण्यात आले.
वरील गुन्ह्याच्या तपासाबाबत मा. वरिष्ठ पोलीस निराक्षक अरविंद माने यांनी सायबर विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, पोहवा रुपेश वाघमारे, पो अंमलदार आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांना तपास करणेबाबत महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. त्यानुसार आमचे गुप्त बातमीदाराद्वारे व तांत्रिक माहितीचे विश्लेषन करून चोरी करणा-या महिला सासवड या भागात असल्याचे समजले. सदर गुन्हयाचे गार्मिय लक्षात घेवून मा. वरिष्ठ पोलीस निराक्षक अरविंद माने यांनी तात्काळ सासवड येथे महिला पोलीस अंमलदारा सहीत पथक रवाना करून आरोपी महिला नामे १) मिराबेन सुनिल सोळकी, वय ३५, रा. खंडोबानगर, सासवड, पुणे, २) गिता विजय कांगिया वय खंडोबानगर, सासवड, पुणे, मुळ, रा साबरमती, गुजरात यांना ताब्यात घेतले व अधिक = ४५, रा चौकशीकामी पोलीस स्टेशन येथे आणले. दाखल गुन्हाबाबत विश्वासात घेवून चौकशी केले असता सदरचा गुन्हा हा त्यांनी केल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेला मोबाईल फोन व रोख रक्कम २५,०००/- रुपये हस्तगत करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. वंसत कुंवर, सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड, सहा पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक, निसार शेख, पोह रुपेश वाघमारे, पो अंमलदार आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार रुचिका जमदाडे यांनी केली.

