उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे गायनेकोलॉजिस्ट ची व्यवस्था नसल्याने रुग्णांना पाठविले जाते वर्धा सेवाग्राम सावंगी त्यामुळे होत आहे प्रसुती रुग्णांचे बेहालं.
अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- गरीब – गरजू रुग्णांसाठी असलेल्या आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या तुलनेत रुग्णालयात तज्ञ डॉक्टर किंवा इतर कर्मचारी नसल्यामुळे अशा महिलाना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आर्वी तालुक्यातील गोरगरीब रूग्णांना जीवनदायी असलेले आर्वी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय शहरातील व आजूबाजूच्या गाव खेड्यातील अनेक नागरिक याठिकाणी आरोग्य सुविधेचा लाभ घेतात मात्र, मागील काही महिन्यांपासून रुग्णालयातील प्रसूती विभाग खुद सलाईनवर आहे. गायनेकोलॉजिस्ट नाही किंव्हा इतर तज्ञ डॉक्टर नाही या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे गरोदर महिलांची फार कुचंबणा होत आहे.
आर्वी उपजिल्हा रुग्णालयात स्त्री प्रसुती सिजेरियन ची कुठल्याही व्यवस्था नाही व प्रसुती करीता आलेल्या रूग्णांना वर्धा किंव्हा सेवाग्राम, सावंगी मेघे येथे रेफर करण्यात येत असते. नाही तर रुग्णालयातील डॉक्टर खाजगी रुग्णालयात ४० ते ५० हजार रुपये खर्च करण्यास आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर प्रव्रुत करतात. ही गोरं गरिबं जनता कुठून इतका खर्च करणार स्वत:हा तर करु शकणार नाही, मग करणार तरी कोण येवढा मोठा खर्च हीच एक मोठी बाब आहे. हा प्रश्न फक्त शहरातील नसुन पुर्ण आर्वी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या आहे व आर्वी विधानसभा क्षेत्रातील, युवक कॉंग्रेस कमेटी ने याच विषया संदर्भात सीएसडीएम यांच्याकडे अनेक दा तक्रार देवुन सुद्धा त्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही.
शेवटी आता आर्वी विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेस कमेटी ऍक्शन मोड वर, येत्या आठ दिवसांत जर का उपजिल्हा रुग्णालय आर्वी, येथे गायनेकोलॉजिस्ट ची व्यवस्था न झाल्यास थेट उपजिल्हा रुग्णालयावर युवक काँग्रेसचां धडक मोर्चा काढण्यात येणार यावेळी काही अनुचित घटना घडली तर याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती माजी आरोग्य सभापती, तथा माजी नगरसेवक, रामू राठी यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

