आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पुढील सात दिवस विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या नागपूर येथील वेधशाळेने वर्तविली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत नैसर्गिक आपत्ती ओढावली होती, तर यंदा जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विशेष नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हवामान खात्याच्या अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून नदी काठावरील गावांवर विशेष वॉच ठेवला जात आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरस्थिती ओढावली होती. त्यावेळी नदी काठा वरील अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते, तर आता पुढील सात दिवस वर्ध्यासह संपूर्ण विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत आठही तालुका प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
नदी काठावर २१४ गावे वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६,३१० चौ. कि.मी. आहे. शिवाय प्रशासनाच्या सोयीसाठी आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, वर्धा, समुद्रपूर, सेलू व हिंगणघाट या आठ तालुक्यांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात नदी काठावर तब्बल २१४ गावे असून पुढील सात दिवस जिल्हा प्रशासनाचा या गावांवर वॉच राहणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

