आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील वर्धा शाखा अभियंता प्रेमीकेला टाळायला लागल्याने प्रेमीकेने संपर्क साधून थेट जिल्हा परिषद गाठली. या ठिकाणी प्रियकर शाखा अभियंता याची भेट घेतली असता त्याने तिला मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी प्रेमीकेने पोलिसांत तक्रार दाखल केली असता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषदच्या आवारात घडली.
प्रेमीला महिला ही विवाहित असून ती आठ वर्षापूर्वी पतीपासून विभक्त झाली. तिचे आर्वी हे माहेर असल्याने तिचे आर्वीत जाणे – येणे होते. याच दरम्यान आर्वीत शाखा अभियंता असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्याही भेटी गाठी सुरु झाल्या. असे बरेच दिवस चालल्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून प्रियकर प्रेमीकेला टाळायला लागला. बरेचदा फोन केल्यानंतरही प्रतिसाद देत नव्हता. अखेर १७ जुलैला प्रेमीकेने सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान शाखा अभियंत्यास फोन केला असता त्याने जिल्हा परिषद, वर्धा येथे असल्याचे सांगितले. त्यामुळे भेट घेण्याकरिता प्रेमीका तडक जिल्हा परिषदेत आली. परंतु प्रियकर काही वेळानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला.
यावेळी दोघांचीही भेट झाल्याबरोबर प्रियकराने मारहाण सुरु केली असता त्याच्या हातातील कडे प्रेमीकेच्या डोक्यावर लागून रक्त निघायला लागल्याचे महिलनेते तक्रारीत म्हटले. हे प्रकरण पोलिसात पोहोचताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाद सोडविला. प्रेमिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रियकर शाखा अभियंता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

