पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020694626
कोंढवा व वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे अरबाज उर्फ लॅब इलियाज खान वय २४ वर्षे, रा. स.नं. ५ आश्रफनगर, लेन नं. ७, अल्ला हु अकबर बिल्डींग, फ्लॅट नं. २०२, कोंढवा, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चॉपर, तलवार, सुरा, लोखंडी रॉड या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने साधी दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षांमध्ये त्याचेविरुध्द १० गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीगुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे व श्री चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ३१ वी कारवाई असून, यापुढेही सराईत च अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे

