कवी लेखक अरुण निकम, मुंबई
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे बाटतो माणूस त्याच धर्माचा ,
माणसाच्या सावलीने, स्पर्शाने.!
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे संघर्ष करावा लागला,
पिण्याच्या पाण्यासाठी महाडला .!
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे दीर्घकालीन सत्याग्रह केला,
देवाच्या दर्शनासाठी, नाशिकला..!
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे माणसाला जाती चिटकवून,
केली वाटणी वर्ण व्यवस्थेने.!
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे द्यावी लागली झुंज,
स्त्रियांच्या मुक्ततेसाठी, उत्थानासाठी.!
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे पती निधनानंतर,
सती जाण्याची प्रथा होती.!
नसे भूतलावरी दुसरा देश,
जिथे जन्मला भिमराया ,
संघर्षिला तो देशात आणि परदेशात.!
मानवी मूल्यांसाठी ,
समान अधिकारासाठी,
स्त्रियांच्या मुक्तीसाठी,
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी.!!!
कवी लेखक अरुण निकम, मुंबई
9323249487. 8459504317.