✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने दिनांक २३ जुलै रोज रविवारला दुपारी १:०० वाजता वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, सह संपर्कप्रमुख रविकांत बालपांडे, पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक प्रमुख प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, भारत चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उपतालुका प्रकाश अनासाने, महिला जिल्हा संघटिका सौ. संगीता कडू, सौ. माधुरी खडसे, सौ.सीमा गलांडे, सौ.निताताई धोबे, यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वतंत्र भारतातील एक राज्य मणिपूर येथे जो निंदनीय प्रकार घडला त्याचा निषेधार्य कारंजा चौक येथे केंद्र व राज्य सरकार चा निषेध नोंदविण्यात आला.
मणिपूर येथे घडलेली भयावह घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुरोगामी भारत देशा मध्ये स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही स्त्रीला अशा हीन दर्जाची वागणूक मिळावी हे निंदनीय आहे. प्रगत आणि निरोगी समाजाची ग्वाही देणाऱ्या देशांमध्ये स्त्रीला निर्वस्त्र करणारे नराधम असावेत ही समाजाची शोकांतिका आहे आणि आपण या अशा समाजाचा भाग आहोत याची आज लाज वाटते आहे. मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्या पासून मईते आणि कुकी समाजामध्ये संघर्ष उफाळला आहे. तेथे अनेक वेळा दंगली आणि जाळपोळ झाली. त्यामध्ये १५० पेक्षा जास्त लोक दगावली आणि ३००० पेक्षा जास्त जखमी झालीत. केंद्र सरकारचे दुर्लक्ष आणि मणिपूर सरकारच्या पोलिसांची ढिसाळनीती याचे परिणाम तेथील जनता भोगत आहे. आणि कहर म्हणजे तेथील मैतेई समाजाचा जमावाणे कुकी समाजा च्या दोन नव्हे तर तीन स्त्रियांना निर्वस्त्र केले अशी माहिती आहे. वायरल व्हिडिओमध्ये दोन ज्या स्त्री दिसतात पण प्रत्यक्षात तिघीवर अत्याचार झालेत. ही घटना दिनांक ४ मे २०२३ ची असून ७५ दिवसांनी व्हिडिओ समोर आला आहे. तेथील भाजपा सरकारने ही घटना लपवून ठेवली. मणिपूर मध्ये दोन महिन्यापासून इंटरनेट सुविधा बंद आहे. पत्रकारांना धमकवून गप्प बसविले आहे आणि गोदी मीडिया चूप आहे. व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत पंतप्रधानांनी मणिपूर प्रश्नावर मौन बाळगले आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांचा प्रक्षोभ पाहून त्यांनी गुळमुळीत सारवा सारव केली आहे. त्या २३ वर्षाच्या पिढीतेचे असेही म्हणणं आहे की, आमची धिंड निघत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. हे सर्व अतिशय निंदनीय आहे व लोकशाहीला घातक आहे. कोणत्याही समाजामध्ये मतभेद व संघर्ष असतील तर सामोपचाराचे अनेक मार्ग आहेत. संघर्षाची कारणे काहीही असली तरी त्या स्त्रियांना दिल्या गेलेल्या वागणुकीचे समर्थन कदापी होऊ शकत नाही. केंद्र सरकारने आपले अधिकार वापरून दंगली का रोखले नाहीत ? तेथे त्यांनी सैन्यबळ वापरून कायदा व सुव्यवस्था का स्थापन केली नाहीत? पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनी तेथे जाऊन पाहणी का केली नाही? तेथील भाजपाचे मुख्यमंत्री मैतेई समुदायाचे असल्यामुळे त्यांचा दंगलखोरांना मूळ पाठिंबा तर नाही ना? सरकारला मणिपूर धगधगत ठेवायचे आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणाऱ्या राष्ट्रांमध्ये महिलांसोबत असा जगन्य अपराध होतो, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यातील एक पिडीता ही एका माजी सैनिकाची पत्नी आहे. त्या सैनिकाचे म्हणणे आहे की, मी देशाचे संरक्षण केले पण माझ्या पत्नीचे व माझ्या परिवाराचे संरक्षण करू शकलो नाही. हे त्याचे वक्तव्य विषण्ण करणारे आहे. आता भाजपाचे तथाकथित संस्कृती रक्षक कुठे आहेत? धर्म, हिंदुत्व, संस्कृती, संस्कार याच्या नावाने बोंबा ठोकणारे भाजपची नेते कुठल्या बिळात लपून बसलेत? पक्ष बाजूला ठेवून एक महिला म्हणून निषेध करायला भाजपची महिला आघाडी का पुढे सरसावत नाही भाजपाच्या चित्राताई वाघ कुठे आहेत? आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने या अक्षम्य घटनेची तीव्र निषेध व निंदा करतो मणिपूर येथील मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा व तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. दोषींना तात्काळ फासावर लटकून त्या पिढीतांना तात्काळ न्याय मिळावा अशी आमची भावना आहे.
आजच्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या शिवसैनिक मनीष देवडे, शंकर मोहमारे, श्रीधर कोटकर, मनोज वरघणे, बंटी वाघमारे, गजानन काटोले, मनोज मिसाळ, नितीन वैद्य, दिनेश धोबे, संजय पिंपळकर, रुपेश काटकर, लक्ष्मण बकाने, गोवर्धन शाहू, अनुराग काशीनिवास, सौ.सीमाताई खूपसरे, सौ. नीलिमा मोहमारे, सौ.कविता डेकाटे,सौ. प्राची पाचखेडे,सौ. आरती काळे, सौ. प्रियंका धोटे, सौ. माया खंदार, सौ.अरुणा झाडे, भास्कर ठवरे, पंचायत समिती उपसभापती श्री. अमोल गायकवाड, गजानन काटोले, मनोज मिसाळ, संजय पिंपळकर, लक्ष्मण बकाने, नरेंद्र गुळकरी, जयंत रोहनकर, शंकर झाडे, रुपेश काटकर, अनिल लालटेनवार, नितीन वैद्य, सचिन मुळे, मोहन तुमराम, सौ.माधुरी खडसे, सौ. सीमा गलांडे, प्राची पाचखेडे, अशोक आंबटकर, भोलाशिंग चव्हाण, अशोक भुरसे, सुनील आष्टीकर आशिष जयस्वाल, दिनेश धोबे, गोपाल मेघरे, सुधाकर डंभारे, मंगेश भोयर, जाणू पडवे, विनोद मोहाड, अभय वानखेडे, गौरव गाडेकार, मनोज जुमडे, पंकज ठाकरे, हिरामण आवारी, नथुजी कुकडे, शंकर इंगोले, मुन्ना शेख ,दिलीप ड॔भारे, सुभाष काटकर, अरुण सोनटक्के, मनोज धनवंत, रामराव रहाटे, पवन तिवारी, शंकर भोंभले, प्रकाश भुसारी, शब्बीर शेख, दिलीप आमगे, ज्ञानेश्वर हेडाऊ, अशोक झाडे, राजू तपासे, सतीश फटिंग, वेदांत वावधने, प्रजय ढोमणे, उमेश निरगुडे, देवा सोयाम, सौ.आरती काळे, प्रकाश झाडे, संदीप नरड, नरेश तामगाडगे, भारत नागपुरे, भास्कर भिसे, शुक्राचार्य बनकर, सिद्धार्थ पाटील, अविनाश धोटे, अतिक मिर्झा, वसीम शेख, मोहन जाधव, कार्तिक मेश्राम, बंडू लाखे, अनंत सोरटे, पांडुरंग निखाडे ,पियुष वरघणे, नरेश भजभूजे, प्रियंका धोटे, कैलास ठाकूर, भगवान वर्धने, पंकज ठाकरे, दुर्योधन कोल्हे, अरुण सोनटक्के, दीपक वर्हाडे, सौ.सविता डेकाटे, गौरव संजय गिरडकर, सुरेश चौधरी, जितेंद्र साळवे इत्यादी शिवसैनिक संयुक्त आढावा बैठकी करिता उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348