युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- सध्या बौध्द धम्मतील पवित्र असा वर्षावासाचा महिना सुरू आहे. त्यांच्या औचित्य साधून कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे अंतर्गत भगवान गौतम बुद्धाचा कर्म सिद्धांत ही धम्म प्रवचन मालिका राबविण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कोहळी शाखाचे अध्यक्ष इंदिराताई बागडे ह्या होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतिय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाहने तर प्रवचन मालिका प्रवचनकार भारती बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस राहुलजी वानखेडे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा कर्म सिद्धांत यावर विस्तृत असे प्रवचन करून उपासक व उपासिका याना उपरोक्त विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सुदर्शन बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष आयु. मनोज चिचखेडे, माया वानखेडे , वेणूबाई बागडे, जिजा चनकापुरे, सुलोचना रंगारी, आशाबाई उके, नंदा चंकापुरे शिलाबाई बागडे, बेबीबाई बागडे, संघमित्रा उके, सुमन तागडे, रमाबाई उके, रमा भोवते, युवराज उके, राजेश गजभिये, नम्रता बागडे, सविता बागडे, मीना चनकापुरे इत्यादी उपासक-उपासिका बहुसंख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन राजेश गजभिये यांनी केले.

