दोषी वर कारवाई करत तात्काळ अटक करण्याची मागणी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मणिपूर येथे दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही या घटनेच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. हिंगणघाट शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच्या वतीने निषेध करण्यात आला.
मणिपूर येथील महिला अत्याचाराची घटना अत्यंत वेदनादायक व संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून निषेध करत दोषी वर तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अमानवीय अत्याचार व क्रूर कर्म हे त्वरित थांबवावे या घटना म्हणजे भारतातील लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत. तसेच गुन्हेगारांना त्वरित अटक करावी व हा अत्याचार थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा उपाध्यक्ष सिमा तिवारी, सरचिटणीस सुजाता जांभुलकर, तालुका उपाध्यक्ष मीनाक्षी धाकने, युवती शहर अध्यक्ष माधवी देशमुख, दिपाली रंगारी, विदया गिरी, आचल वकील, शितल माटे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

