अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 29 जुलै:- रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वा. सावनेर येथील भालेराव हायस्कूल समोर असलेल्या बालाजी सेलिब्रेशन हॉल,येथे मा.दिव्या भोसले (राष्ट्रीय कार्यालयीन सचिव व्हाईस ऑफ मीडिया) यांच्या अध्यक्षतेत ‘व्हाॅईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संपादक संघटनेचा जिल्हा स्तरिय स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे म्हणून उद्घाटक मलिक विराणी तहसीलदार सावनेर, जिल्हा नागपूर मार्गदर्शक विनोद बोरे प्रदेशाध्यक्ष व्हाॅईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग, स्वागताध्यक्ष ॲड. प्रा. गुजाजी बरडे (शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, विशेष उपस्थिती ॲड.चंद्रशेखर बरेठीया माजी अध्यक्ष तालुका बार असोसिएशन सावनेर तथा विधीतज्ञ, ॲड. अरविंद लोधी माजी नगराध्यक्ष सावनेर, डॉ.अशोक चोपडे सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक तथा पूर्व संपादक, मासिक मराठामार्ग, प्रमुख उपस्थिती मंगेश खाटीक विदर्भ विभाग अध्यक्ष, आनंद आंबेकर नागपूर जिल्हाध्यक्ष, व्हाॅईस ऑफ मिडीया, नेमिनाथ जैन प्रदेश कार्याध्यक्ष, व्हाॅईस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंग, गोपाल कडूकर राज्य सहसरचिटणीस, व्हाॅईस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंग, देवनाथ गंडाटे जिल्हाध्यक्ष, डिजिटल मीडिया विंग, कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग भोंगाडे जिल्हाध्यक्ष व्हाॅईस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंग तसेच नागपूर जिल्हा साप्ताहिक संपादक व पत्रकार हे आहेत.
यावेळी जिल्हातील तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक, पाक्षीक, मासिक, वार्षिक तसेच डिजिटल माध्यमांमध्ये काम करणा-या पत्रकारांच्या व संपादकांच्या हक्कासाठी लढा देणा-या या संघटनेतील पदाधिका-यांचा सन्मान होणार आहे. या स्नेहमिलन कार्यक्रम सोहळयात नागपूर जिल्ह्यातील सर्व साप्ताहिकांचे पत्रकार व संपादक सहभागी होणार आहे.यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

