पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४८३/२०२२ भा.द.वि. क्र. ३०७. ५०४, ५०६ (२),३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ सह क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ ये क. ३(१)(i), ३(२) व ३(४) मधील पाहिजे आरोपी नामे आकाश सुभाष गाडे रा. रामनगर सिंहगडरोड पुणे हा आठ महीन्यापासून फरार असुन त्याचा शोध तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार हे घेत होते.
दि.२७/०७/२०२३ रोजी मा. सहायक पोलीस आयुक्त सो. सिंहगडरोड विभाग पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशान्वये तसेच कोबिंग ऑपरेशन दरम्यान पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार / ८६०० देवा चव्हाण व पोलीस अंमलदार/ १०५१० सागर शेडगे यांना त्याचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पाहीजे आरोपी आकाश सुभाष गाडे रा. रामनगर सिंहगडरोड पुणे हा भुमकर चौकाजवळ स्वामी नारायण मंदिर जवळ न हे पुणे येथे थांबलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही मा. श्री अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खाजी करुन पुढील योग्य ते कारवाई करण्याचे आदेश दिल्याने लागलीच तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम व त्यांचा पोलीस स्टाफ सदर मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन सापळा लावुन दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी आकाश सुभाष गाडे हा मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश सुभाष गाडे वय २५ वर्षे रा. रामनगर राम मंदिर जवळ सिंहगडरोड पुणे असे सांगितले, त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. २७/०७/२०२३ रोजी २१.४५ वा. सुमारास दाखल गुन्ह्याचे तपास कामी अटक करुन त्यास पुढील कारवाई कामी मा. श्री. राजेंद्र गलांडे सो सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर यांचे समक्ष हजर केले असुन
पुढील अधिक तपास मा. श्री. राजेंद्र गलांडे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. सुहेल शर्मा पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ०३ पुणे शहर मा.श्री. राजेंद्र गलांडे सो सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर मा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, श्री. सचिन निकम, सहा. पोलीस निरीक्षक गणेश मोकाशी पोलीस उपनिरीक्षक श्री. आबा उत्तेकर, सहा. पोलीस फौजदार, पोलीस अंमलदार संजय शिंदे, विकास पाडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, राजु वेगरे, अविनाश कोंडे यांनी केली आहे.

