अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये व महा. प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा सुनिताताई चव्हाण आणि विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाने आंबेडकरी कार्यकर्ते सतिश इंगळे यांनी रिपाइं (आंबेडकर) मध्ये चेंबूर-मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वर्धा जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
दिनांक २७ जुलै २०२३ रोजी रिपाइं (ए) वर्धापन दिनी सतिश इंगळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महा. प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव राजेंद्र आठवले, कैलास मोरे, गिरीधर रौराळे, विदर्भ संघटक प्रबोधनकार संविधान मनोहरे, जिल्हा संघटक समाधान पाटील, जिल्हा सचिव सुभाष कांबळे, वर्धा तालुका अध्यक्ष सुनिल वणकर, मिलिंद तामगाडगे तसेच वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राजु थूल, जिल्हा युवा सचिव अंकीत रामटेके,रमेश जामलेकर,जयकांत पाटील,राष्ट्रपाल गणविर, प्रकाश कांबळे, प्रविण पोलके, किशोर फुसाटे, प्रविण कांबळे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सतिश इंगळे यांचे अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

