डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- शहरात गेली दहा दिवसा पासून मणिपूर घटनेचा निषेध म्हणून मोर्चे आंदोलन होत आहे. दि.२८ जूलै २०२३ रोजी सायंकाळी ६:३० वाजता ख्रिश्चन फोरम पिंपरी चिंचवड शहर यांनी आयोजित केलेले मणिपूर राज्यातील हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन सांत्वन सभेस सर्व राजकिय, सामाजिक पक्ष-पार्टी- संस्थेचे नेते उपस्थित होते.
या निषेध आंदोलनात मानव कांबळे, मारुती भापकर, कैलाश कदम, मुस्लिम समाजाचे जुबेर खान तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व चर्चचे पाळकवर्ग आणि ख्रिस्ती समाजातील लोक शेकडोच्या संख्येने उपस्थितीत होते. युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्टचे रेव्ह. सुधीर पारकर, ऑल पीपल फेलोशीपचे रेव्ह. रेजी थॉमस, तळेगाव मेथाडिस्ट चर्चचे रेव्ह. जोसेफ ढालवाले आणि. के. डी. सी. चर्चचे रेव्ह. सुनील चोपडे, पास्टर अविनाश काटे, पास्टर दिलीप काळे, पास्टर मोझेस वाघमारे, पास्टर दानिएल अँथोनी, पास्टर लीनास दास, पास्टर मार्क, पास्टर भास्कर साबळे, भीम शक्तीच्या श्रीमती अनिता, श्रीमती रिबेका अमोलीक, पास्टर अभिषेक शुक्ला, पास्टर सतीश खरचने, युथ ख्रिश्चन फोरमचे दनियल दळवी, सुनील जाधव, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. या निषेध सभेचे आयोजक ख्रिश्चन फोरमचे सर्व पदाधिकारी स्नेहल डोगरदिवे, सतीश नायर, नितीश दुबे, मंगेश काळे तसेच अध्यक्ष पास्टर राजेश केळकर हे उपस्थित होते.
मणिपूर हिंसाचार प्रकरणा विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील ख्रिस्ती समाज प्रथमच रस्त्यावर उतरला होता आणि या समाजाला इतर समाजाने ही खूप छान असा प्रतिसाद दिला. या वेळी मारुती भापकर यांनी जातीपातीत गटातटात एवून निषेध न करता त्या मूली ख्रिश्चन समाजाच्या नसून भारत देशाच्या मूली आहेत असे सांगीतले. या नंतर काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कैलाश कदम यांनी सांगीतले की आमचा लढा हा जातियवादी धूर्त भाजपा सरकारचे विरोधात सतत सूरूच आहे. मणिपूरमधे त्यावेळी फक्त दोनच भगिनी मारल्यात की अनखी ही जास्त बंधू भगिनींची हत्या केलीय हे समजायला तयार नाही कारण इन्टनेटची सेवा या राज्यात बंद केलेली आहे. यात पूढे जावून मानव कांबळे यांनी भाजप सरकारला मनुवादी, खोटारडे, “अपने मनकी बोलने वाले, दूसरोंकी नही सूनने वाले” असा उल्लेख केला रविवारी पंतप्रधानांनी मनकी बात न करता मणिपूर की बात करावी असे आपल्या वक्तव्यात केले. उपस्थित सर्व महिलांनी मेनबत्ती पेटवून भाजपा केंद्र सरकार व मणिपूर राज्य सरकारचा निषेध केला. शेवटी सर्वांनी देशात शांतता पून्हा प्रस्थापीत व्हावी व मृत भगिनींच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून देवा जवळ प्रार्थना केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348