पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दि 28/07/2023 रोजी वपोनी सुनिल थोपटे व पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील स्टाफसह हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम बदरके यांच्या गोडाऊन जवळील गंगानगर,फुरसुंगी, पुणे येथील सार्वजनिक रोडवर अफीम विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता वपोनी सुनिल थोपटे व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे मोहनलाल मेगाराम बिश्नोई वय 24 राहणार बगरापूर मारवाडी तहसील बुडामालाने जिल्हा बाडनेर राज्य राजस्थान याचे ताब्यात किंमत रुपये एकूण 60,10,000/- चां ऐवज त्यामध्ये 60,00,000/- रुपये चा 3 किलो 29 ग्रॅम अफीम हा अंमली पदार्थ 10,000/- रुपये की चा एक मोबाईल असं अमली पदार्थ विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध हडपसर पो. स्टे. गु.र.नं.1114/23 एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क),17 (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा. अपर पोलिस आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे, सो मा. पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके. दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार, योगेश मांढरे. शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी. संतोष देशपांडे, संदीप जाधव, महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदीप शेळके, रवी रोकडे यांनी केली आहे.