पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०५/१२/२०१६ रोजी नागपुर चाल येरवडा पुणे येथे चव्हाण या महिलेस कार्यक्रमामध्ये नाचत असताना का मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या बाबत जसप्रितसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ संतोष कांबळे, रा ६११, कासेवाडी, भवानीपेठ, श्रीगणेश मित्रमंडळा शेजारी, पुणे यांचेविरुध्द येरवडा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक- ६२२/१६ भादवि कलम ३५४(अ), ३२३, ५०९, ५०४,४२७, पोक्सो ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०७ वर्षांपासून फरार होता त्यास पुणे शहर आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणुन घोषित केले होते.
दि. २७/०७/२०२३ रोजी युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट १ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत ७ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा त्याच्या घरी जाला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वपोनि शब्बीर सय्यद कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि आषिश कवठेकर व अंमलदार यांची टीम तयार करून त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार युनिट एकचे अधिकारी व अमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अजय उर्फ चाटल्या संतोष कांबळे, रा ६११, कासेवाडी, भवानीपेठ, श्रीगणेश मित्रमंडळाशेजारी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे येरवडा पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले तसेच येरवडा पोलीस ठाणेस सदर बाबत संपर्क करून खात्री केला असता सदरचा आरोपीत हा सन २०१६ मध्ये विधीसंघर्षित बालक असताना त्याने सदरचा गुन्हा केल्याचे व तो एम ओ बी लिस्टमधील अ क्र. १६४५ व येरवडा पो स्टेकडील पाहिजे आरोपी लिस्ट मध्ये अ. क्र. १४३ वर त्याचे नाव नमुद असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी येरवडा पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक – सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे- १, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील चपोनि शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार अमोल पवार. अभिनव लड़कत विठठल साळुंखे अण्णा माने ,निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.