प्रा. धनंजय वर्मा उपाख्य महंत वैद्यराज यक्षदेव, महानुभाव यांना सविनय दंडवत प्रणाम. हा लेख गुरुवर्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी लिहित आहे.
लेखिका: सौ. मालती पंजाबराव चांदुरकर चिमोटे लेआऊट दस्तुर नगर, अमरावती मो.७९७२०४७५९४
“वेचलेले चार क्षण” या काव्यसंग्राहाला त्यांनीच अभिप्राय दिला. त्याच्याय आग्रहास्तव हा काव्य संग्रह प्रकाशात झाला. त्याच्याच हस्ते या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा करण्याची माझी इच्छा होती त्याक्षणाची आतुरतेने वाट पहात होती. तो क्षण, तो दिवस म्हणजे ९ जुलै २०२३ रविवारची संध्याकाळ. सात वाजता बाबांचे आगमन झाले आणि वातावरणच संपुर्ण बदलून गेले सर्वांचे चेहरे आनंदाने फुलुन निघाले. हार घालून पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांच्या हस्ते २ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. मान्यवरांनी काव्यसंग्रहा विषयी आपले विचार प्रगट केले. अध्याक्षिस्त भाषणाला बाबांनी सुरुवात करताच त्यांच्या शब्दांनी खुलत्या त्या प्रांगणाच्या कळ्या जशा दवबिंदुने फुलतात फुलांच्या पाकळ्या, श्रोते कुतुहलनाने मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या प्रत्येक शब्द श्रवण करीत होते. त्यांच्या शब्दाशब्दात दडले होते जिवनाचे शास्त्र संपुर्ण वातावरण अध्यात्मिक झाले होते.
सदा हसतमुख, धीर, गंभीर, शांत, निरागस अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाला समाजिक, आध्यात्मिक, व कौटुंबिक, स्वरुप प्राप्त झाले होते. जातांना निरोप घेतांना तोच हसरा चेहरा तीच प्रसन्न मुद्रा आणि म्हणाले तुम्ही अशाच लिहित राहाल थांबू नका परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी आहे व माझा तुम्हाला भरपुर भरभरुन आशिर्वाद आहे. व इतके बोलून डोक्यावर हात ठेवला आणि वाठोडा शुल्केश्वर ला जाण्यास निघाले ते इतके खुश होते इतके आनंदी होते इतका आनंद २३ वर्षात मी कधीच पाहिला नव्हता ते गेल्यानंतर हि त्यांच्या चेह-यावरील हास्याचे स्मरण होत आहे पण हा हर्ष जास्त दिवस टिकला नाही आठ ते दहा दिवसांनी हर्षाला दृष्ट लागली २० तारखेला दुपारी कळले की बाबा अचानक सोडुन गेलेत. विश्वास बसत नव्हता मलाच नाहि तर संपुर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का होता. महानुभाव पंथाचा चमकता दिव्यमान तारा काळोखात विलीन झाला होता. सर्वत्र दिवस असुन हि अंधकाराची छाया पसरली होती. विश्वास बसत नव्हता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शेवटचा कार्यक्रम ठरला. तेथे काढल्या गेलेले छायांचित्रे चलचित्रे हेच त्यांच्या सोबत घालविलेले आमचे अंतिम स्मृतिक्षण ठरले ज्या लोकांना त्या कार्याक्रमात दर्शन झाले ते स्वतःला भाग्यवान समजु लागले.
ते जरी आज दिसत नसले तरी त्यांच्या स्मृती आमच्या सोबत आहे. ते आमच्या अवती भवती असल्या सारखेच वाटतात त्यांच्या कृपादृष्टीचा वर्षाव सदैव त्यांच्या भक्तजनावर होत राहिल. त्यांच्या सोबत अनुभवलला हा कौटुंबिक सोहळा आमच्या स्मृतीत राहील. त्यांनी लावलेला ज्ञानाचा ज्ञानदिप प्रत्येकाच्या हृदयात अखंड तेवत राहील. त्यांनी लावलेल्या या ज्ञान दिपाने दिशा उजळुन निघेल. इतिहासात सवर्ण अक्षरांनी त्यांच्या कर्तव्याची त्यांच्या ज्ञानाची किर्ती अजरामर होईल.
मरावे परी किर्ती रुपे उरावे कधीही भरुन न निघणारी उणीव आम्हांस भासते संपुर्ण जनसमुदाय शोक सागरात बुडाला.
परमेश्वर त्यांच्या आत्माला शांती प्रदान करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना हिच आमची मानवंदना.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348